आधारशी पॅन लिंक कसे करावे? Aadhar pan card kase link karayche in Marathi

How to link PAN with Aadhaar?

Aadhar pan card kase link karayche in Marathi.|How to link PAN with Aadhaar? नमस्कार मित्रानो, आज आपण जाणुन घेणार आहोत कि आपले PAN Card आणि Adhar Card एकमेकांशी लिंक कसे करायचे.भारत सरकारने एका व्यक्तीला पॅन खाते क्रमांक  वाटप झाल्याची किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना एक पॅन वाटप झाल्याची घटना समोर आल्यानंतर आयकर विभागाने पॅनला आधारशी लिंक करण्याची घोषणा केली.

आधारशी पॅन लिंक करणे कोणाला आवश्यक आहे?“Aadhar pan card link karne konala aavashyak aahe”

CBDT ने मार्च 2022 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार, प्राप्तिकर कायदा 1 जुलै 2017 रोजी पॅन वाटप झालेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा/तिचा आधार क्रमांक सूचित करणे अनिवार्य आहे जेणेकरून आधार आणि पॅन लिंक करता येईल. हे ३१ मार्च 2023 रोजी किंवा त्यापूर्वी करणे आवश्यक होते ,तसे न केल्यास पॅन निष्क्रिय होईल. आता भारत सरकारने यासाठी ३१ जुने २०२३ पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे.

आधारशी पॅन लिंक करणे कोणाला आवश्यक नाही? “Aadhar pan card link karne konala aavashyak nahi”

अशा काही व्यक्तींच्या श्रेणी आहेत ज्यांच्यासाठी ही जोडणी अनिवार्य नाही.

  • 80 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती
  • आयकर कायद्यानुसार अनिवासी
  • भारताची नागरिक नसलेली व्यक्ती

पॅन आधारशी लिंक न केल्यास काय होईल?“Aadhar pan card kase link karayche”

सीबीडीटीने म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती आपला पॅन आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झाली तर पॅन निष्क्रिय होईल. अशा परिस्थितीत, ती व्यक्ती त्याचा/तिचा PAN सादर करण्यास, जवळीक करण्यास किंवा उद्धृत करण्यास सक्षम राहणार नाही आणि अशा अयशस्वी झाल्यास प्राप्तिकर कायद्यांतर्गत होणाऱ्या सर्व परिणामांना ती जबाबदार असेल.तसेच काही प्रमुख परिणाम खालील प्रमाणे आहेत. 

  • ती व्यक्ती निष्क्रिय पॅन वापरून आयकर रिटर्न भरण्यास सक्षम असणार नाही.
  • प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया केली जाणार नाही.
  • प्रलंबित परतावा निष्क्रिय पॅन्सना जारी केला जाऊ शकत नाही.
  • पॅन निष्क्रिय झाल्यास जास्त दराने कर कपात करणे आवश्यक होईल
  • या परिणामांव्यतिरिक्त, व्यक्तीला बँकांसोबत इतर आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात, कारण या व्यवहारांसाठी पॅन हा एक महत्त्वाचा KYC निकष आहे.

आधारशी पॅन लिंक कसे करावे?Aadhar pan card kase link karayche in Marathi

१)  सर्व प्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करायचे आहे आणि खाली दाखवल्याप्रमाणे Link Aadhar या पर्यायावर क्लिक करा.

www.incometax.gov.in

२) तुमचा पॅन आणि आधार क्रमांक टाका.

३) E-Pay Tax च्या माध्यमातून Continue to Pay वर क्लिक करा.

४) तुमचा पॅन नंबर आणि ओटीपी प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबाइल नंबर एंटर करा.

५) ओटीपी पडताळणीनंतर, तुम्हाला ई-पे टॅक्स पेज वरती नेले जाईल.

६) खाली दाखवल्याप्रमाणे इन्कम टॅक्स या पर्यायावर वर क्लिक करा.

७) आता AY (2023-24) आणि Other Receipt  (500) म्हणून पेमेंटचा प्रकार निवडा.

८) लागू रक्कम इतरांच्या विरूद्ध पूर्व-भरली जाईल आणि Continue क्लिक करा.

९) आता, चलन तयार केले जाईल. पुढील स्क्रीनवर तुम्हाला पेमेंटचा मोड निवडावा लागेल. आता तुम्ही हे पैसे नेट बँकिंग, डेबिट कार्ड ने भरू शकता.जर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव दिसत नसेल आणि तुम्हाला तरीही नेट बँकिंग, डेबिट कार्ड आणि UPI मार्फत पैसे भरावयाचे असतील तर तुम्ही Payment Gateway हा पर्याय मध्ये कोणत्याही एका बँकेला निवडून Continue वर क्लिक करावे.

१०) आता तुम्ही Pay Now हा पर्याय क्लिक करावे व Terms & Condition वर क्लिक करावे. आता तुम्ही तुमच्या बँकेच्या डेबिट ,क्रेडिट किंवा UPI ने पैसे भरू शकता.

११) आता तुम्ही पैसे भरल्यानंतर तुम्हाला पैसे भरल्याचे चलन डाउनलोड करण्यासाठी मिळेल व ते तुम्ही डाउनलोड  करून  व्यस्थित ठेवावे.

१२) तुम्ही पैसे भरल्यानंतर ४ ते ५ दिवसामध्ये पोर्टल वरती अपडेट होईल व त्यांनंतर परत तुम्हाला www.incometax.gov.in या वेबसाइट वर यायचे आहे आणि पुन्हा तुम्हाला Link Aadhar ह्या पर्यायाला निवडायचे आहे. आणि तुम्हाला परत तुम्हाला  तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून validate वर क्लिक करायचे आहे.

१३) आता तुम्हाला खाली दखवल्याप्रमाणे दिसेल कि तुम्ही जे पैसे भरलेले होते ते त्यांना मिळालेले आहेत व तुम्ही Continue वर क्लिक करा. 

१४) आता तुम्हाला आधार कार्ड वर असलेले नाव लिहायचे आहे व “I agree to validate my Aadhar details” पर्याय निवडून Link Aadhar वर क्लिक करावे.

१५) खाली दाखवल्याप्रमाणे आधार पॅन लिंकची विनंती यशस्वीरित्या सबमिट केली गेली आहे, आता तुम्ही आधार पॅन लिंक स्थिती तपासू शकता.

मला आशा आहे कि आपण नक्कीच आपले पॅन आणि आधार कार्ड वरती सांगितल्या प्रमाणे लिंक केले असेल व त्याचा तुम्हाला लाभ झाला असेल.

धन्यवाद.

Share
Back To Top