आपला प्रिंटर आपल्या कॉम्पुटर सोबत कनेक्ट होत नाही याचे निराकरण कसे करावे?Error 0x0000011b

How to Fix Windows Cannot Connect to Printer – Error 0x0000011

नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती करून घेऊया कि आपला प्रिंटर हा काही वेळा कनेक्ट होत नाही.जेव्हा आपण आपला प्रिंटर लोकल मध्ये शेर करता आणि या प्रिंटरवर दुसऱ्या कॉम्पुटर द्वारे प्रिंन्ट जात नाही त्यावेळी जास्त करून Windows Cannot Connect to Printer -Error 0x0000011 हा एरर येतो.आपण हा एरर कसा घालवायचा ते आपण खाली दिलेल्या माहितीनुसार करूया.

१) सर्व प्रथम तुम्हला ज्या कॉम्पुटर वर प्रिंटर इन्स्टॉल केला आहे त्या कॉम्पुटर वर Win + R दाबून RUN बॉक्स मध्ये जाऊन REGEDIT टाइप करून ओक करावे.

२) Registry Editor मध्ये खाली दिलेला पाथ कॉपी पेस्ट करावे. Computer\HKEY_LOCAL_MACHINE\SYSTEM\CurrentControlSet\Control\Print

३) आता तुम्हाला Print वर राइट क्लिक करून New पर्याय निवडून DWORD (32-bit) Value  वर क्लिक करावे.

४) आता तुम्ही जी value बनवली आहे तिला rename करून खाली दिलेले नाव द्या.

RpcAuthnLevelPrivacyEnabled 

५) आता RpcAuthnLevelPrivacyEnabled value वर राइट क्लिक करून Modify वर क्लीक करून zero टाइप करावे आणि OK करावे.

६) आता तुम्हाला तुमचा कॉम्पुटर रिस्टार्ट कार्याचा आहे जेणे करून आपण केलेली सेटिंग दुरुस्त होईल.

७) कॉम्पुटर पुन्हा चालू झाल्यावर तुम्हला Win + R करून RUN बॉक्स ओपन करावे व त्यामध्ये services.msc टाइप करून ओक क्लिक करावे.

८) आता तुम्हाला Print Spooler शोधून त्यावर राइट क्लिक करून Properties वर क्लिक करायचे आहे आणि एकदा STOP वर क्लिक करून START वर क्लिक करायचे आहे. आता आपल्याला SERVICES बॉक्स बंद करायचा आहे.

९) आता तुम्ही तुमच्या दुसऱ्या कॉम्पुटरव वरती जाऊन प्रिंट देऊन बघा आणि तुमचा जी काही समस्या होती ती दूर झाली असेल. 

धन्यवाद. 

Share
Back To Top